लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केला वेळोवेळी अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

मार्च 4, 2025 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना भुसावळातून समोर आलीय. येथील 28 वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

भुसावळ शहरातील एका भागात २८ वर्षीय तरुणीही वास्तव्याला आहे. दरम्यान ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून ती आपला उदरनिर्वाह करते. १५ मे २०२३ रोजी या तरुणीची ओळख खालीच शहा सलीम शहा रा.जामनेर रोड, भुसावळ याच्याशी झाली. दरम्यान खाली शहा याने तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी खालील शाह सलीम शाह रा.जामनेर रोड भुसावळ याचा विरोधात ३ मार्च रोजी रात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment