---Advertisement---
बातम्या

तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी आयुष्य संपवलं; वारकरी सांप्रदायात खळबळ

girish maharaj more
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२५ । जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे (Tukaram Maharaj) अकरावे वंशज ह. भ. प . शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. दरम्यान, त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मात्र या घटनेने देहू (Dehu) परिसरासह वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे.

girish maharaj more

शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

---Advertisement---

शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. आर्थिक विवंचनेतून हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवाचे संध्याकाळी देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं समजत आहे

“ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरण या सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---