वातावरण पुन्हा बदलणार; जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस असं राहणार हवामान?..

जानेवारी 11, 2025 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२५ । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. जळगावातही तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली असून घसरल्यामुळे थंडीचा कडाका जाणवत असून ग्रामीण भागात शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. मात्र यातच आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

tp 1

खरंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जळगावसह राज्यातील या आठवडयात उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे किमान तापमानात घट होऊन गारठा वाढला होता. काल शुक्रवारी पहाटे जळगावचा पारा ९.२ अंशांवर आल्याने थंडी अंगाला झोंबत होती. आता पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार आहे.

आज ११ व १२ जानेवारी रोजी तापमानात काही अंशी वाढ होणार असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात हे दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन्ही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. किमान तापमान १२ अंशांपर्यंत जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सहावाजेनंतर शहरात वातावरणात गारठा वाढल्याचे जाणवत होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now