धक्कादायक! शिवशाही बस उलटून 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नोव्हेंबर 29, 2024 2:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शिवशाही बस उलटून दहा जणांचा मृत्यू आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर घडली आहे. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

gondia bus accident

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर आज दुपारी शिवशाही बस (क्रमांक एमएच ०९/ईएम १२७३)चा अपघात झाला. दुचाकी अचानक समोर आली. दुचाकी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये शिवशाही बसवरील चालकाचा ताबा सुटला, अन् बस उलटली.

दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसला भीषण अपघात झाला, या अपघातात महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटल्याने १० प्रवाशांचा मृत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झालाय. प्रवाशांच्या माहितीवरून रुग्णवाहिका विभाग आणि पोलीस विभागाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत
दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now