ग्राहकांना झटका ! LPG सिलिंडर पुन्हा महाग, आजपासून नवीन दर लागू

सप्टेंबर 1, 2024 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । ऐन सणासुदीच्या तोंडावर, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा झटका बसला. तो म्हणजे गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. हे नवीन दर आज 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे. मात्र ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. 39 रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झाला नाही.

gas

IOCL च्या संकेतस्थळानवुसर, दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात बदल झाला. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता ही दरवाढ लागू करण्यात आली. ताज्या दरानुसार, राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडर 1652.50 रुपयांहून 1691.50 रुपये झाली. दिल्लीत 39 रुपये प्रति सिलेंडर दरवाढ झाली. कोलकत्ता शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात 38 रुपयांची वाढ झाली. 1764.50 रुपयांहून किंमत 1802.50 रुपयांवर पोहचले. तर मुंबईत 1644 रुपयांहून भाव 1605 रुपये म्हणजे 7 रुपयांनी किंमत वाढली. चेन्नईमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये 38 रुपयांची दरवाढ झाली. 1817 रुपयांहून दर 1855 रुपयांवर पोहचला.

यापूर्वी 1 जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यवसाय आणि व्यावसायिक उद्योगांना दिलासा देण्यासाठी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती. 1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 30 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तर ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात वाढ केली आहे.

दुसरीकडे 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. सध्या दिल्लीत एका सिलेंडरची किंमत 803 रुपये, कोलकत्तामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 818.50 रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now