अर्थसंकल्पानंतर गॅस सिलिंडर महागला ; आजपासून नवे दर लागू

ऑगस्ट 1, 2024 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण आहे. कारण एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. अर्थसंकल्पानंतर तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत. दुसरीकडे घरगुती वापरात असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

Gas jpg webp

सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेला बदल व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. त्यामुळे 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 6.5 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. बदल झालेले हे नवे दर आज 1 ऑगस्ट 2024 पासूनच सुरू होत आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी जास्त वापरला जातो. त्यामुळे येथील जेवणाच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी 19 किलोग्रॅमचे सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाले होते याच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. किंमती कमी केल्यानंतर आता पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत.

नवे दर असे?
आजपासून मुंबईत १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे.पूर्वी हे दर १५९८ रुपये होते. तर घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर त्यात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now