सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; जळगावातील नवीनतम किंमत तपासा

जून 23, 2024 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आनंदवार्ता आहे. सोने-चांदीच्या दरात वाढ होत असताना दोघांच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. जळगाव सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोन्याचा भाव १००० रुपयांनी कमी झाला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात किलोमागे १००० रुपयांची घट झाली आहे.

gold silver 1

या दरघसरणी मागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात सोन्याचे दर बऱ्यापैकी स्थिर तर चांदीच्या दरात एक हजाराची वाढ व घसरण होत होती. शुक्रवारी सोने ७३,१०० रुपये प्रति तोळा तर चांदी ९१ हजार रुपये किलो असे दर होते. शनिवारी दुपारी सोने ७२१०० रुपये तोळा तर चांदी ९० हजार रुपये किलोवर झाली.

दरम्यान आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ८० हजारांवर तर चांदीचा दर १ लाखावर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now