७५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

फेब्रुवारी 24, 2022 6:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात 75 वर्षीय महिलेवर गर्भपिशवीची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे डॉक्टरांनी ही कामगिरी फत्ते केली.

DK jpg webp

धरणगाव येथील 75 वर्षीय महिलेला एक महिन्यापासून पोटात त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी चोपडा येथील रुग्णालयात उपचार घेतले. त्याठिकाणी गर्भपिशवीची समस्या असल्याचे निदान झाले. परंतु रुग्णाचे वय आणि त्यांना असलेला पाठीच्या कण्याचा त्रासामुळे शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे प्रयत्न दोनदा अयशस्वी ठरले. वयोवृद्ध रुग्णाला भूल देताना मोठी रिस्क असल्याने व संबंधित रुग्णालयात आयसीयूची उपलब्धता नसल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी असमर्थता व्यक्त केली.
यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना देवकर रुग्णालयातील अद्ययावत आई सी यु कक्ष व सोयीसुविधांची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी महिलेला या ठिकाणी ऍडमिट केले. रुग्ण महिलेच्या पाठीच्या कण्याची समस्या, पायात एक वर्षापूर्वी टाकलेला रॉड व त्यांच्या पायांमध्ये तयार झालेल्या रक्ताच्या गाठी यामुळे ही शस्त्रक्रिया करणे अतिजोखमीचे होते. शिवाय चोपडा येथे दोनदा त्यांना भूल देण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. आताही त्यांना शस्त्रक्रियेसाठी भूल देणे हे अतिशय जिकिरीचे होते. मात्र या सर्व जोखमींवर मात करत डॉक्टरांनी अतिशय कौशल्याने शस्त्रक्रिया पार पाडली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले. काही दिवसातच रुग्ण महिला अगदी ठणठणीत झाली. त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी देवकर रुग्णालयाचे आभार मानत येथील अद्ययावत वैद्यकीय सुविधांचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now