⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावलमध्ये ५५ वर्षीय प्रौढाची राहत्या घरात गळफास

यावलमध्ये ५५ वर्षीय प्रौढाची राहत्या घरात गळफास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । यावल शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या मुलाने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. या नैराश्यातून त्यांनी देखील टोकाचे पाऊल उचलले.

रामचंद्र पंडित मेढे असे मृताचे नाव आहे. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरातील रहिवासी राजेंद्र पंडीत मेढे हे सोमवारी रात्री आपल्या घरात झोपले होते. मध्यरात्रीनंतर घराच्या छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे डॉ. शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले.

मुलाच्या आत्महत्येमुळे नैराश्यात जगत हाेते जीवन
गेल्या वर्षी २८ एप्रिल २०२१ रोजी रामचंद्र मेढे यांचा मुलगा कन्हैया मेढे (वय २८) याने देखील याच घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेपासून रामचंद्र मेढे हे निराश होते. यातूनच त्यांनी घरात त्याच अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह