⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावचे रस्ते होणार चकाचक : जळगाव शहराच्या विकासासाठी मामांनी आणले अजून पाच कोटी

जळगावचे रस्ते होणार चकाचक : जळगाव शहराच्या विकासासाठी मामांनी आणले अजून पाच कोटी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी नुकताच शंभर कोटींचा निधी आणला होता यातच त्यांनी अजून भर घातली असून अजून पाच कोटींचा निधी आमदार भोळे यांनी जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी आणला आहे. यामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी आमदार राजुमामा भोळे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शंभर कोटीचा निधी आणला आहे. या निधी पाठोपाठ आता पुन्हा पाच कोटी रुपयांचा निधी जळगाव शहराला मिळाला आहे. जळगाव शहरातील विस्तारलेल्या भागांमध्ये रस्ते व्हावे यासाठी हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आमदार राजूमामा भोळे कधीच आपल्या विरोधकांवर टीका करत नाहीत. आमदार भोळे नेहमीच म्हणतात की मी विरोधकांवर टीका न करता केवळ आणि केवळ शहराचा विकास करणार. या दृष्टीने आमदार भोळे यांनी पुढाकार घेतला असून 100 कोटी आणल्यानंतर आता पुन्हा आमदार भोळे यांनी जळगाव शहरासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

पाच कोटींच्या निधीतून खालील रस्ते होणार

  1. जळगाव शहरातील प्रभाग क्र.१४ अंतर्गत लेक रेसिडेन्सी ते गणेश घाट पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : ५०.०० लक्ष
  2. जळगाव शहरातील प्रभाग क्र.१४ अंतर्गत गट नं.४१४ कंपाउंड च्या आतील मुख्य रस्ता व इतर लहान पाच रस्ते डांबरीकरण करणे : ६०.०० लक्ष
  3. जळगाव शहरातील प्रभाग क्र.०६ व १६ अंतर्गत रुख्मा टेंट हाउस ते सुपारी कारखाना व गणेश अपार्टमेट ते पार्श्वनाथ प्लास्टिक पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे : २१.०० लक्ष
  4. जळगाव शहरातील प्रभाग क्र.०६ अंतर्गत रामदेव बाबा मंदिर ते लिटल स्टेप प्ले स्कुल पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : ३८.२५ लक्ष
  5. प्रभाग क्र.०७ अंतर्गत अक्झॉन ब्रेन हॉस्पिटल पासून ते श्री.प्रमोद बसेर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. ६७.२५ लक्ष
  6. प्रभाग क्र.१२ अंतर्गत श्री.टोके यांच्या घरापासून ते श्री.झवर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : ३२.५० लक्ष
  7. प्रभाग क्र.११ अंतर्गत रामानंद नगर रिक्षा स्टॉप पासून ते श्री. अत्तरदे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : २२.०० लक्ष
  8. प्रभाग क्र.१२ अंतर्गत श्री.डोंगरे यांच्या घरापासून ते श्री.अमोल चौधरी यांच्या घरापर्यंत ते श्री.सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : २०.०० लक्ष
author avatar
Tushar Bhambare