⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

संत बाबा गुरदासराम यांच्या ९१ व्या जन्मोत्सव निमित्त निःशुल्क तपासणी शिबिराचा 468 रुग्णांना लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पीटल मधे दि. १५ जुन २०२२ बुधवार रोजी श्री संत बाबा गुरुदासराम यांच्या ९१ व्या जन्मदिवसानिमित्त आयोजीत भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबिर संस्थेचे व्हा.चेअरमन दिलीपकुमार मंधवानी, ट्रस्टी धनराज चावला यांच्या मार्गदर्शना खाली सम्पन्न झाले.

सदर शिबीरात डॉ. श्रुती जोशी, डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील या नेत्रतज्ञांनी 356 नेत्ररुग्णांची तपासणी केली यापैकी 78.रुग्णांची मोतीबींदु शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असुन त्यांच्यावर येणाऱ्या आठवड्यात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच पेशंट व सोबत नातेवाइकास चहा, नाश्ता व जेवणं मोफत देण्यात येणार आहे. डॉ. तुषार बोरोले यांनी तुषार पैथोलॉजी मार्फत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्त तपासणी मोफत करून अनमोल सहकार्य केले. त्याच बरोबर 09 रुग्णांची डोळ्याच्या मागील पडद्याची रेटीना तपासणी डॉ. श्रुती चांडक यांचे मार्फत मोफत करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी व डॉ. सुप्रिया कुकरेजा यांनी 57 दंतरुग्णांची मोफत तपासणी केली तसेच डॉ. मोहनलाल साधरिया यांनी 46 रुग्णांची जनरल तपासणी मोफत केली.

रक्तदान शिबीरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे हे सामाजिक कार्य लक्षात घेऊन उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व उपस्थितांनी त्याचे मनःपुर्वक आभार मानले सदरहु रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करून सामाजीक ऋण फेडले यात महिलांनी सुध्दा उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला या रक्तदान शिबीरास माधवराव गोळवलकर रक्तपेढी व त्यांच्या कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिबीरात सर्वप्रकारच्या तपासण्या मोफत असल्यामुळे जळगाव शहरासह जिल्हाभरातील 468 शिबिराचा रुग्णांनी लाभ घेतला असे ट्रस्ट चे चेअरमन डॉ. गुरुमुखदास जगवाणी, व्हा.चे. दिलीपकुमार मंधवानी, सचिव डॉ. मुलचंद उदासी यांनी कळविले आहे. सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी बाबा गरिबदास मंदिराचे सर्व ट्रस्टीगण व नेत्रज्योती हॉस्पीटल चे रमेशलाल मंधान, मनोहरलाल जाधवानी, शंकरलाल थौरानी, व रमेशलाल परप्यानी, समस्त कर्मचारी वृंद, हॉस्पिटल अडमिनीस्ट्रेटर डॉ. सुचंद्र चंदनकार, नितीन झोपे, सौ. जया रेजडा व सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.