जळगावातील 32 वर्षीय विवाहितेवर अत्याचार ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुन २०२३ । जळगाव शहरातील 32 वर्षीय विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण करून नंदुरबारच्या तरुणाने शारीरीक संबंध ठेवले व नंतर आरोपीने संबंध असल्याची बदनामी करण्याची धमकी दिली. याच बरोबर मुलांना ठार मारण्याची धमकी देत देखील दिली. पुन्हा अत्याचार केल्याची घटना सुमारे दोन वर्ष आधी ते आजपर्यंत घडली. या प्रकरणी नंदुरबार शहरातील दीपक देवानंद टाक (नंदुरबार) या तरुणाविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 1 jpg webp

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका भागात 32 वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. दीपक देवानंद टाक (रा.नंदुरबार) हा विवाहितेच्या संपर्कात आल्यानंतर त्याने जवळीक वाढवून प्रेमसंबंध ठेवले व नंतर विवाहितेच्या घरी येत शारीरीक संबंध ठेवले.

नंतर पीडीतेने संबंधास ठेवण्यास नकार दिल्यानंतर संशयित दीपकने आपले प्रेम संबंध असल्याचे सवार्वंना सांगण्याची धमकी देऊन वेळोवेळी पीडीतेच्या इच्छेविरुद्ध दोन वर्षापासून शारीरीक संबंध ठेवत अत्याचार केला तसेच पीडीतेसह तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण, शिवीगाळ करीत पैशाची मागणी केली. याबाबत विवाहितेने तक्रार दिल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now