बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

कढोलीच्या ३२ वर्षीय इसमाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा!

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । कढोली येथे दीपक प्रकाश कोळी (वय ३२) याने घरातील सर्वजण शेतात गेले असताना राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना काल मंगळवारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, कोळी हे आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपक प्रकाश कोळी (वय ३२) हे एरंडोल तालुक्यातील कढोली येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी त्यांच्या घरातील सर्वजण शेतात गेले असताना कोळी यांनी ११.३० वाजेच्या सुमारास घरातील अँगलला गळ फास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. दरम्यान, आजारपणास कंटाळून दीपक कोळी याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांच्या कयास आहे. याबाबत कैलास कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अनिल पाटील. काशिनाथ पाटील. दत्तात्रय पाटील हे पुढील तपास करीत आहेत.