⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त दीपस्तंभ मनोबलचे २५ विद्यार्थी दत्तक

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या ५८ व्या वाढदिवसा निमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ठाणे यांच्या तर्फे दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलचे २५ दिव्यांग, अनाथ विद्यार्थी वर्षभरासाठी दत्तक घेण्यात आले आहेत.या साठी फाऊंडेशनच्या माध्यमातून मनोबल प्रकल्पाला २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या काळात आणि नंतरही महाराष्ट्रातील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून नामदार एकनाथजी शिंदे यांच्य वाढदिवसनिमित्त आम्ही हि सामाजिक जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.महाराष्ट्रातील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल हा प्रकल्प अत्यंत उल्लेखनीय कार्य करीत आहे.त्यामुळेच आंम्ही येथील २५ विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत आहोत असे प्रतिपादन या प्रसंगी ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

चार महिन्यांपूर्वी ना.एकनाथजी शिंदे आणि प्राचार्य प्रदीप ढवळ यांनी जळगाव जिल्हा दौऱ्याच्या वेळी मनोबल प्रकल्पाला भेट दिली होती.या प्रकल्पाचे कार्य बघून ते अत्यंत प्रभावित झाले होते, व त्यांनी त्यावेळी प्रकल्पासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.प्रकल्पाच्या बांधकामासाठी सुद्धा त्यांचे सहकार्य होत आहे.त्यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व समाजाची सेवा करण्याची अधिकाधिक संधी मिळो अश्या भावना दीपस्तंभ मनोबलचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या.

हे देखील वाचा :