जळगावातील भोईटे मार्केटमधील तब्बल २४ गाळे सील

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । जळगाव मनपा प्रशासनाने मुदत देऊनही थकीत भाड्याची रक्कम न भरल्याने भोईटे मार्केटमधील तब्बल २४ गाळे सील केले आहे. मार्केटमधील गाळ्यांप्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

bhoite market shoop seel jpg webp

जळगाव महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मनपाकडून अनेकवेळा आवाहन करण्यात आलं होतं. मनपाने भोईटे मार्केटमधील गाळेधारकांना ३१ जानेवारीपर्यंत थकीत भाड्याची रक्कम भरण्यासह नुतनीकरणासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचा सूचना मनपा दिल्या होत्या. मात्र, या मुदतीत या मार्केटमधील एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम व नुतनीकरणासाठीचे प्रस्ताव देखील सादर केले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व शाम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अवघ्या २ तासातच या मार्केटमधील सर्वच म्हणजे २४ दुकाने सील केली आहेत. याआधी मनपाने महात्मा फुले मार्केटमधील १३ दुकाने एकाच वेळी सील करण्याची कारवाई केली होती. कारवाई करण्याआधी संबधित गाळेधारकांना मनपाची थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना देण्यात आल्या. मात्र, कोणीही थकीत भाड्याची रक्कम भरली नसल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

जप्त गाळ्यांचा लिलाव होणार

महापालिका अधिनियमानुसार जे गाळेधारक नुतनीकरणाचे निकष पूर्ण करतील असेच गाळेधारक नुतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. अन्यथा गाळेधारक नुतनीकरणासाठी पात्र नाहीत, असं समजून गाळे जप्त केल्यानंतर या गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करू शकते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now