२ हजाराची नोट चलनातून बाद, जाणून घ्या कुठे आणि कशा जमा करणार नोट?

जळगाव लाईव्ह न्युज । १९ मे २०२३ । भारतात मूल्यात असणाऱ्या 2000 च्या नोटा या बँकेत जमा करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. 30 सप्टेंबरच्या आत नागरिकांना या नोटा बँकेत जमा करायचे आहेत. तोपर्यंत या नोटा चलनात राहणार आहेत.

अधिक माहिती अशी की रिझर्व बँकेने 2000 च्या नोटा पुन्हा जमा करण्याचा निर्णय घेतला आहे 30 सप्टेंबर पर्यंत या नोटा नागरिकांनी जमा करायच्या आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत या नोटा जमाना केल्यास त्या केवळ एका कागदाचा तुकडा म्हणून राहणार आहेत.

2016साली नरेंद्र मोदींनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती यावेळी त्यांनी पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यावेळी 2000 च्या नवीन नोटा बाजारात आल्या होत्या. आता या २ हजाराच्या नोटा देखील चलनातून बंद करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे

एका वेळेस नागरिकांना केवळ 20 हजार रुपये म्हणजे दहा नोटा जमा करता येणार आहेत. बँकांना यासाठी विशेष काउंटर ची सोय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत या नोटा चलनात असणार आहेत मात्र त्यानंतर त्या चलनात राहणार नाहीत.