⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आशिया कपसोबत ‘या’ 2 खेळाडूंच्या करिअरचा शेवट, पहा कोण आहेत?

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । आशिया कप 2022 (Asia Cup 2022) सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. टीम इंडियाने या टूर्नामेंटची शानदार सुरुवात केली, पण सुपर-4 टप्प्यात टीम इंडिया लागोपाठ दोन सामने हरले. अशा परिस्थितीत जेतेपद पटकावण्यापासून दूर राहिल्याने टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे. टीम इंडियाच्या पराभवाला अनेक खेळाडू जबाबदार होते, पण संपूर्ण आशिया कपमध्ये दोन खेळाडू फ्लॉप ठरले. हे दोन्ही खेळाडू आगामी काळात भारतीय संघातून कायमचे बाहेर पडतानाही दिसू शकतात.

भुवनेश्वर कुमार :
टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज आशिया कपमध्ये संघाचा सर्वात मोठा खलनायक ठरला यात शंका नाही. भारतीय संघाच्या सुपर 4 मधील पराभवाला सर्वात मोठा जबाबदार कोण असेल तर तो भुवनेश्वर कुमार आहे. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला शेवटच्या 2 षटकात 21 धावांची गरज होती, त्यामुळे रोहितने भुवनेश्वरवर विश्वास दाखवत त्याला 19 वे षटक दिले. मात्र भुवीला त्याच्या अनुभवाचा फायदा उठवता आला नाही आणि त्याने या षटकात 14 धावा खर्च केल्या.

असाच काहीसा प्रकार पाकिस्तानविरुद्धही पाहायला मिळाला. जिथे 19व्या षटकाची जबाबदारी भुवीकडे सोपवण्यात आली होती. पाकिस्तानविरुद्धही त्याने १९व्या षटकात १९ धावा खर्च केल्या. दोन्ही प्रसंगी अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात केवळ 7 धावा मिळाल्या, ज्याला वाचवणे फार कठीण होते.

केएल राहुल :
टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन केएल राहुल आशिया कपमध्ये अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये होता. आशिया चषकापूर्वी राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. सलामीवीर म्हणून राहुल पूर्णपणे अपयशी ठरला. केएल राहुल श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 6 धावा करून बाद झाला. रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलही अवघ्या 28 धावा काढून बाद झाला.

त्याने आतापर्यंत आशिया चषकातील तीन सामन्यांमध्ये 106.67 च्या स्ट्राइक रेटने 28 धावा केल्या आहेत. राहुलला वर्ल्डकपमधून वगळणे योग्य ठरेल का, असा प्रश्न आता त्याच्या खराब कामगिरीवर उपस्थित केला जात आहे. राहुलच्या जागी ईशान किशन सलामीची जबाबदारी स्वीकारू शकतो. याशिवाय शिखर धवनसारखे अनुभवी सलामीवीरही संघाबाहेर बसले आहेत.