⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

१७ खासदारांची मत फुटली : द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती असणार आहेत. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असणार असून दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत. त्यांच्या आधी प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. राष्ट्रपती निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. मुर्मू यांना १,८९, ८७६ मते मिळाली.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला.