हृदयद्रावक! दोन मुलांना वाचवताना तरुणासह १६ वर्षीय मुलीचा गिरणेत बुडून मृत्यू

मार्च 9, 2026 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या भडगाव शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलोय. भडगावातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह १६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी घडली. नदीन खान नसीम खान (२७) आणि काफिया शरीफ पिंजारी (१६) असे पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेल्यांची नावे असून या घटनेने मोठी खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी भडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली आहे.

nadim khan

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रातील डोहाजवळ दोन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. परंतु, अचूक अंदाज न आल्याने अचानक खोल पाण्यात गेली. दरम्यान, काही मुले पाण्यात बुडत असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नदीम खान या तरुणाच्या लक्षात आले. मुलांचा जीव धोक्यात असल्याचे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब न करता धाडसाने नदीत उडी घेतली. नदीमने मोठ्या प्रयत्नाने दोन मुलांना पकडून सुरक्षित बाहेर देखील आणले. मात्र, याच वेळी काफिया पिंजारी ही मुलगी खोल पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

नदीमने क्षणाचाही विलंब न करता काफियाला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीपात्रातील खोल खड्ड्यांमध्ये असलेल्या भौरीच्या पाण्यात अडकून काफिया पिंजारी व नदीम खान यांना बाहेर येता आले नाही. दुर्दैवाने या दोघांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने गिरणी नदीकडे धाव घेतली. काहींनी दोघांना शोधण्याचा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांनाही बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील, नगराध्यक्षा रेखा मालचे यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now