⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | १३० रुपयांसाठी तरुणाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी

१३० रुपयांसाठी तरुणाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । पानटपरी वर १३० रु. देण्या-घेण्याच्या उधारीच्या वादातून तरुणाचा खून करणाऱ्या संशयिताच पोलिसांनी अटक केली असून सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील वाल्मीक नगरात पन्नालाल कोरकु (वय ५५) याची किरकोळ टपरी आहे. त्याचे मयत तरूण भिमसिंग जगदीश पवार (वय २८ रा. बाबा रामदेव नगर ) याच्याकडे १३० रु. उधारीचे पैसे होते. त्या पैश्याला जास्त दिवस होवून देत नसल्याच्या कारणावरून तू तू मैं मैं झाली. मात्र, टपरी चालक पन्नालाल कोरकू याने गुप्तांगात हात टाकत पिळवून टाकल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पन्नालाल कोरकु हा घटनेची खळबळ उडताच अवघ्या तासात फसार झाला होता. या प्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल होता. सदर घटनेची दखल घेत फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी, सुरेश अडायके यांना आरोपी तासासाठी रवाना केले होते. आरोपीच शुक्रवारी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मयताची कौटुंबीक परिस्थिती हालाखीची
मयत भिमसिंग पवार यांचे वडील नसल्याने मोल मजुरी करून कुटुंबाचा उरनिर्वाह करीत होता. दरम्यान आईला घटनेची माहिती मिळताच तिने एकच हंबरडा फोडला, त्यांच्या पश्चात आई , भाऊ, बहिणी आहे. या घटनेमुळे कुटुंबाची मोठी हानी झाली असून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह