..अन् क्षणार्धात 200 क्विंटल कापूस जळून झाला खाक, 10 ते 15 लाखाचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील एका कापसाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत सुमारे दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाला असून जवळपास दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

हा कापूस मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत गोडाऊनमधील तब्बल दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाले आहे.

या आगीत सुमारे १० ते १५ लाख रुपयांचा नुकसान वाणी यांना झाले आहे.तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मेहूणबारे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना मिळताच लागलीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याप्रकरणी पंचनामा करुन पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.