⁠ 
रविवार, मे 19, 2024

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायसोनीत रक्तदान शिबीर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी एलिटतर्फे जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रीती अग्रवाल (संचालक – GHRIBM), सोनल तिवारी (तत्त्व ज्युनियर कोलाज) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मुलांचे मनोगत वाढवताना “रक्तदान हे सर्वोत्तम दान” या विषयावर आपण स्वतःचे रक्तदान केले.

रोटरॅक्ट सदस्य
क्लबचे अध्यक्ष यश लड्ढा, सचिव लोकेश पारेख, संभव मेहता, विवेक पाटील, खुशबू दुग्गड, मंजरी वाळके, हर्षदा लाड, प्रणव चौधरी, अतुल पाटील, जागृती निगम, पूजा चौधरी, विवेक वाणी संदेश तोतला, धनश्री सैंदाणे, मोहित शर्मा, एच कांचन, एच. मोगरे, दिव्यांका सोनवणे, प्राजकता पाटील, हर्षाली पाटील, मानसी साळुंके आदी उपस्थित होते.

Club Mentor – श्रेया कोगटा
योगिता पाटिल , मोनाली शर्मा , रफीक शेख ,बिपाशा पतरा, कल्याणी नेवे, प्रकाश शर्मा , मयूर जखेटे , वसीम पटेल , रवि शर्मा आदी उपस्थित होते.