⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

राजकारणातील मोठी अपडेट; शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी भेट घेलातली यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. संजय राऊतांवर ईडीची कारवाई होऊन २४ तासही उलटत नाहीत तोच पवार मोदींच्या भेटीला पोहोचले.

यावेळी पवार म्हणाले कि, मोदींना लक्षद्वीपच्या प्रश्नांवर भेटण्यासाठी गेलो होतो. सोबत विधान परिषद सदस्य नियुक्ती तसंच संजय राऊतांवरील कारवाईबाबतही बोलणं झाल्याचं पवारांनी सांगितलं. पवारांनी मोदींची भेट घेतल्याने राष्ट्रवादी पुन्हा भाजपशी जवळीक साधते आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार उत्तम काम करतंय. उद्धव ठाकरे ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील तसंच महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल”

याच बरोबर पवार म्हणले कि, भाजपसोबत कोणतीही जवळीक नाही. भाजपसोबत कोणतेच संबंध ठेवणार नाही.महाविकास आघाडी उत्तम काम करतेय. सरकारला अडीज वर्ष झाले आहेत, उर्वरित काळही पूर्ण करु. महाविकास आघाडी आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुन्हा लढून महाविकास आघाडी सत्तेत येईल”