⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

बोदवड महाविद्यालयाचा वैभव भोंबे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । बोदवड येथील विज्ञान महाविद्यालय वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी वैभव भोंबे याने कला सांस्कृतिक समिती एस.एन.डि.टी. महाविद्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमंक पटकावला आहे.

१२ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान राष्ट्रीय युवा दिन साप्ताह निमित या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात १४ रोजी लोकशाही बळकटी मध्ये माझी भूमिका, इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नस उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य समाजाचे दिशादर्शक, स्वच्छता हे मिशन नसून अंगिकारायची वृत्ती आहे, स्त्री शक्ती ही आदिशक्ती अशा विविध विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात वैभव भोंबे याने शेती देशाचा आर्थिक कणा या विषयावर आपले मत मांडले. त्याच्या वकृत्वला उपस्थितीतानी दाद दिली व त्याला परीक्षकांनी सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याचे जाहीर केले.

यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिठूलालजी अग्रवाल, उपाध्यक्ष अजयजी जैन, सचिव विकासजी कोटेचा, ज्येष्ठ संचालक ऍड. प्रकाश सुराणा तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी विशेष कौतुक केले. सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बारी व डॉ.वंदना बडगुजर यांनी मार्गदर्शन केले असे प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :