⁠ 
मंगळवार, मार्च 19, 2024

पैसे पडल्याची बतावणी करत सव्वा लाख लुटले

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । चालत्या दुचाकीवरून”काका तुमचे पैसे खाली पडले” अशी बतावणी करून अज्ञात भामट्यांनी १ लाख २५ हजार रूपये लागोलाग दुचाकीची डिक्की फोडुन लांबवील्याची घटना आज सोमवार (१९) सकाळी साडेअकरा वाजता पाचोरा रस्त्यावरील वर्धमान पेट्रोल पंपाजवळ घडली.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष रामकृष्ण बोरसे (रा शहापुर, ता. जामनेर) हे सकाळी  अकराच्या सुमारास कृषी विकास शाखेतुन घरगुती खाजगी कामासाठी सव्वा लाख रुपये काढुन नेहमीप्रमाणे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले,आणी शहापुरकडे जाण्यासाठी निघाले.

मात्र बँकेपासुनच पाळतीवर असणाऱ्या अज्ञात भामट्यांनी पाठलाग करून पेट्रोलपंपाजवळ बोरसे यांना गाठुन वरीलप्रमाणे बतावणी केली,आणी काही कळायच्या आत सर्वच्या-सर्व रक्कम लंपास करून स्वतःजवळील दुचाकीवरून सुसाट वेगाने पोबरा केला.या घटनेप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यापुर्वी याच परीसरातुन सज्जन पाटील नामक व्यक्तीलाही वरीलप्रमाणेच पैसे पडल्याचे सांगुन सुमारे दिड लाख रूपये लांबवीले होते. त्यापुर्वीही युनीयन बँकेतुन पैसे काढुन आणलेल्या ईसमाचे अशाच प्रकारे लाख रुपयांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.वरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरवींद मोरे करीत आहेत.