⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

..तर राजकीय पुढारी असो की… महिला आयोग गुन्हा दाखल करेल : रुपाली चाकणकरांचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज मंगळवारी जळगाव दौऱ्यावर आले आहे. यावेळी जळगावात तक्रारींच्या जनसुनावणीसाठी चाकणवर उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महिलांविषयी एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पुन्हा जर काही वादग्रस्त वक्तव्य केलं तर राजकीय पुढारी असो किंवा इतर कुणीही व्यक्ती असो त्यांच्यावर थेट महिला आयोग गुन्हा दाखल करेल, असा इशारा दिला आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला आहे.

मागील काही दिवसापूर्वी राज्यात ठीकठिकाणी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं समोर आलं होते. राज्य महिला आयोगाकडून त्यांना नोटीसही पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांचा माफीनामाही प्राप्त झाला. महिलांविषयी अनेक कायदे आहेत, मात्र त्यानंतरही अशा पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या संस्कार व संस्कृतीचा भाग आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला तडा जाणार नाही असे वर्तन करू नये,’ असं आवाहनही चाकणकर यांनी केलं आहे.

अमृता फडणवीसांवर टीका
दरम्यान, यावेळी चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘आपल्या विचारांतून आपले संस्कार आणि संस्कृती दिसते आणि ते महाराष्ट्र पाहात आहे. अमृता फडणवीस सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याविषयी जनतेच्या मनात द्वेष निर्माण व्हावा, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करून खतपाणी घालत असतात,’ अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी केलेल्या या टीकेवर अमृता फडणवीस आणि भाजपकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचा :