जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । पाचोरा येथील २१ वर्षीय विवाहितेचा सासरच्या लोकांनी बळजबरीने गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. सीमा सागर शिवणेकर असे विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या तक्रारीवरून साक्री पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, पाचोरा येथे राहणाऱ्या सीमा सागर शिवणेकर हिचा सासरच्या लोकांनी बळजबरीने गर्भपात केला. पती मनोरुग्ण असून देखील विश्वासघात करुन सासरच्यांनी तिचा छळ केला. माहेराहून ७ लाख ७० हजार रुपये आणण्याची मागणी करीत मारहाण केली. सीमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन साक्री पोलिस ठाण्यात पती सागर संतोष शिवणेकर, सासू मंगलाबाई, सासरे संतोष लालचंद शिवणेकर, दीर योगेश उर्फ कोमल, मामसासरे विजय ब्राह्मणे, दिप्ती ब्राह्मणे, शिवलाल पुना ब्राह्मणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशियतांना अटक करावी अशा मागणीचे निवेदन सीमा शिवणेकर यांच्या वडीलांनी जिल्हा पाेलिस अधिक्षकांना दिले आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






