आयएमएतर्फे आरोग्यावर प्रभातफेरी

एप्रिल 9, 2022 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।९ एप्रिल २०२२ । येथील आयएमए जळगावतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त दि ७ रोजी सकाळी ६:३० वाजता आयएमए हॉल जिल्हा पेठ येथून प्रभातफेरी काढण्यात आली. यात आयएमएच्या ६० सभासदांनी सहभाग नोंदविला.

ima 1

यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे, समन्वयक डॉ. पंकज शाह व डॉ. सारिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण व आरोग्य या विषयी ही फेरी काढण्यात आली. प्रभातफेरीचा समारोप गांधी उद्यान येथे करण्यात आला. समारोपप्रसंगी बालरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील यांचे पर्यावरण आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस दल, जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे सहकार्य लाभले. या वेळी डाॅक्टर अादी उपस्थित हाेते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now