जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । नगरउत्थान महाअभियानाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या वीस रस्त्यांसाठी महानगरपालिकेने न हरकत परवानगी दिली आहे. यामुळे जळगाव शहरातले तब्बल वीस रस्ते लवकरच चकाचक होणार आहेत. अमृत योजना या परिसरामध्ये आटोपल्याचा दावा पालिकेने केला आहे. यामुळे मक्तेदाराकडून तातडीने काम सुरू करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.

शहरात रस्त्यांवरून महानगरपालिका प्रशासन टार्गेट होत आहे नागरिक मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका प्रशासनावर रोश व्यक्त करत आहेत मंजूर झाल्याचे काम वारंवार सांगितले जात आहे. मात्र काम होत नाहीत यामुळे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. अशा वेळी नागरिक महानगरपालिकेवर रोष व्यक्त करत आहेत.मात्र या सगळ्यांमध्ये आता महानगरपालिकेने न हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे लवकरच वीस रस्त्यांची काम मार्गी लागणार असून जळगाव शहरातील वीस रस्ते चकाचक होणार आहेत.
हे रस्ते होणार चकाचक
क्रांती चौक ते मनपा शाळा क्रमांक १ व जैन दवाखाना ते अमर चौकापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे,
रामभाऊ जोशी मार्केट ते डॉ. कोतवाल दवाखानापर्यंत नवीपेठ पर्यंतचा रस्ता,
आप्पा महाराज समाधी रोड ते गायत्री मंदिर विसनजीनगर पर्यंतचा १२ मीटरचा रस्ता,
बी.जे.मार्केट ते गुजराथ स्वीट मार्ट पर्यंतचा र रस्ता, आर. आर. विद्यालय ते महालक्ष्मी स्वीट मार्ट पर्यंतचा रस्ता,
गोविंदा ठे रिक्षा स्टॉप ते हनुमान मंदिरापर्यंतचा रस्ता, रिंगरोड सायली हॉटेलपासून स्टेडियम चौकापर्यंतचा रस्ता, बजरंग बोगदा ते नवसाचा गणपती मंदिर ते पिंप्राळा रेल्वेगेट पर्यंतचा रस्ता, ख्वाजामियाँ युनिटी चेंबर ते प्रभुदेसाई कॉलनी रेल्वे लाइनपर्यंतचा १५ मीटर रुंदीचा रस्ता,
सोमाणी मार्केट ते श राष्ट्रीय महामार्ग बाजार रोडपर्यंतचा रस्ता,
शिव कॉलनी बाजार पट्टा ते विद्युत कॉलनी पर्यंतचा रस्ता,
एकलव्य क्रीडा संकुल ते कोल्हेनगर १०० रे फुटी रोड, डी-मार्ट ते काव्यरत्नावली चौक पर्यंतचा रस्ता,
आर. आर. शाळा ते नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्या घरापासून बीएसएनएलपर्यंतचा चे रस्ता,
अग्रवाल हॉस्पिटल ते ऑफिसर क्लबपर्यंतचा रस्ता,
कासमवाडी ते गु, राष्ट्रीय महामार्ग ६ जुना मेहरूण रोड डांबरीकरण करणे,
एस. टी. वर्कशॉप ते कोल्हे विद्यालयापर्यंतचा रस्ता,
मेहरूण काशिनाथ हॉटेल ते अशोक किराणापर्यंतचा रस्ता,
सुप्रीम कॉलनीतील ३० मीटर रूंद रस्त्यापासून तंत्र प्रेमाबाई जैन शाळेपर्यंतचा रस्ता,
राधिका हॉवेल ते तालुका पोलिस चा स्टेशनमागील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.











