उपाध्यक्ष किरण परदेशी, उत्सव प्रमुख म्हणून ललित कोतवाल, हभप देवदत्त महाराज मोरदे यांच्या भागवत सप्ताहाचेही आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । येथील लोकमान्य युवा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक दुर्गोत्सव २०२२ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सारंग चौधरी, उपाध्यक्षपदी किरण परदेशी तर उत्सव प्रमुख म्हणून ललित कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा दुर्गोत्सवात हभप देवदत्त मोरदे महाराज यांच्या श्रीमद देवी भागवत कथेचेही आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी लोकमान्य युवा प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक दुर्गोत्सव आयोजित केला जातो. यंदाच्या उत्सवासाठी लोकमान्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक महेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आबा सपकाळे, मनोज पोकळे, दिग्विजय तिवारी, गणेश ठाकूर हे मार्गदर्शक उपस्थित होते.
कार्यकरिणीमध्ये अध्यक्षपदी सारंग चौधरी, उपाध्यक्ष किरण परदेशी, सचिवपदी हर्षल तुळसकर, सहसचिव धनंजय आमोदकर या प्रमुख नियुक्तींसह उत्सव प्रमुख म्हणून ललित कोतवाल यांची निवड झाली. तसेच सरचिटणीस प्रसाद विसपुते, सहसरचिटणीस राहुल नागला, खजिनदार केतन जाधव, सहखजिनदार श्रीकांत चव्हाण यासह विशेष आमंत्रित म्हणून सुधीर कोकाटे, आनंद पांडे, भूषण दांडेकर, पियुष गांधी, सचिन लाहोटी, रोहित पाटील, केतन पाटील, धनंजय जयस्वाल, हिमांशू हिंगू, ललित आमोदकर, राकेश थोरात, डॉ. यश मोरे, रोशन पाटील यांचा समावेश आहे.
या वेळेला दुर्गोत्सवामध्ये हभप देवदत्त महाराज मोरदे यांच्या श्रीमद देवी भागवत कथा सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या स्थापनेच्या दिवशी देवीचे प्रथम दर्शन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते मंडप उघडून केले जाणार आहे. श्रीमद् देवी भागवत कथा २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर यादरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम इंद्रप्रस्थ नगरातील वीर सावरकर सभागृहाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.












