दुर्दैवी : अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याचा २५ क्विंटल हरभरा पाठवला

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मार्च २०२३ : यावल तालुक्यातील किनगाव बु॥ येथे शेतात आग लावुन सुमारे २५ क्विंटल हरभरा पेटवुन दिल्याचे कृत्य समोर आले आहे. यावेळी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत असं;असल्याचे समजले.

किनगाव बुद्रुक येथील राहणारे ईब्राहीम बिस्मिल्ला कुरेशी यांच्या डोणगाव शेत शिवारातील गट क्रमांक२३८मधील क्षेत्रातील शेतातील १४ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतात मध्यभागी तोडणी करून ठेवलेला हरभरा सुमारे दिड लाख रूपये किमतीचा २५ क्विंटल हरभरा कुणीतरी अज्ञात व्याक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

आपल्या शेतातील हरभरा पेटल्याची माहीती शेजारच्या शेतातील लोकांनी शेतमालक ईब्राहीम कुरेशी यांनी कळविली. या संदर्भात ईब्राहीम बिस्मिला कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे