⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत 40 जागांसाठी भरती ; तब्बल 60,000 रुपये पगार मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत भरती निघाली आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2023 आहे. लक्ष्यात असू द्या ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. ZP Jalgaon Bharti 2023

किती पदे रिक्त आहेत?
या भरतीअंतर्गत एकूण 40 पदे रिक्त आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ही भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदासाठी केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा एमबीबीएस उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 150/- रुपये [मागासवर्गीय – 100/- रुपये]

किती पगार मिळेल? उमेदवारांना दरमहा एकत्रित 60,000/- रुपये मानधन दिले जाईल
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

उमेदवारांसाठी महत्वाचे :
अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल. शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल.
एकापेक्षा अधिक संवर्गाकरीता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक संवर्गाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावा. उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
वरील पदांपैकी ज्या पदांसाठी उमेदवार मिळणार नाही अशा पदांच्या उमेदवारांची मुलाखत दर गुरुवारी (सुटीचे दिवस सोडुन) मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे दालनात घेण्यात येईल. सदरील पदे भरेपर्यंत वेगळी जाहीरात प्रसिध्द करण्यात येणार नाही.
राखीव प्रवर्गातील अथवा समांतर आरक्षणामधील उमेदवार न मिळाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.
उपरोक्त पदांकरीता पात्र उमेदवार यांच्या गुणवत्तेच्या आधारे व मुलाखत घेऊन एकूण गुणानुक्रमाची यादी तयार करून निवड करण्यात येईल किंवा निवड समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येईल त्याबाबतचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगांव यांनी राखुन ठेवलेले आहेत.
एमबीबीएस या पदाकरीता शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त विशेषतज्ञ/ अधिकारी या पदांकरीता अर्ज करीत असल्यास त्यांनी शासकीय सेवेत रुजु झालेचा दिनांक, कार्यकाळ, पदनाम व निवृत्ती झालेले वर्ष, सेवानिवृत्तीच्या दिनांकास मिळालेले अंतिम वेतन व सेवा निवृत्ती नंतर देय असले वेतन (पेन्शन), याबाबतची संपुर्ण माहिती अर्जामध्ये नमुद करावी.
एमबीबीएस पदासाठी वयोमर्यादा ७० वर्ष राहील. वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी शारीरीक दृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे स्वाक्षरीने सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतरच नियुक्ती

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग) जिल्हा परिषद जळगाव.

अधिकृत संकेतस्थळ : zpjalgaon.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा