---Advertisement---
राष्ट्रीय वाणिज्य

आनंदाची बातमी! आता इंटरनेटशिवायही चालणार YouTube, कसं ते घ्या जाणून..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटला मानवाची जीवनरेखा म्हटले जाते. Internet ने जगाला जवळ आणलंय. यासोबतच आपल्या रोजच्या जीवनात इंटरनेट एवढं महत्त्वाचं झालंय की, त्याशिवाय आपलं पानही आता हलत नाही. इंटरनेटशिवाय लोकांना कंटाळा येऊ लागतो. याशिवाय प्रवास करताना माणसाला इंटरनेटची सर्वाधिक गरज भासते. कारण प्रवास लांबला आणि करमणुकीचे साधन नसेल तर माणसाला कंटाळा येऊ लागतो.

Internet Youtub jpg webp

अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल डेटा संपला तरीही तुम्ही YouTube चा आनंद घेऊ शकता. तुम्ही यूट्यूबचा ऑफलाइन मोड वापरू शकता. YouTube चा हा मोड तुमचा प्रवास आनंदाने भरून जाईल. खरंतर हा ऑफलाइन मोड वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम इंटरनेटच्या मदतीने YouTube वर तुमचे काही आवडते व्हिडिओ डाउनलोड करावे लागतील. यानंतर, तुम्ही हे व्हिडीओ तुम्हाला पाहिजे तेव्हा इंटरनेटशिवाय पाहू शकता.

---Advertisement---

तुम्हाला फक्त Youtube मध्ये हा पर्याय निवडावा लागेल
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आजकाल रेल्वे स्थानकांवरही वायफाय सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या आवडीचे व्हिडिओ यूट्यूबवर डाउनलोड करू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला YouTube वर जावे लागेल आणि प्ले बटणावर लिहिलेला डाउनलोड पर्याय निवडावा लागेल. असे केल्याने तुमचा व्हिडिओ डाउनलोड होईल. एवढेच नाही तर तुम्ही तुमचा यूट्यूब व्हिडिओ एचडी क्वालिटीमध्ये डाउनलोड करू शकता. व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही YouTube च्या डाउनलोड विभागातून डाउनलोड केलेला व्हिडिओ पाहू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---