बिबट्याने शौचास गेलेल्या तरुणाला उसाच्या शेतात फरफटत नेलं, पाचोरा तालुक्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२३ । पाचोरा तालुक्यातील सार्वे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे शौचास गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करत त्याला उसाच्या शेतात फरफटत नेलं. यात त्याचा मृत्यू झाला असून मोबाईल लोकेशनवरून त्‍याचा आज तपास लागला. सुजित दिगंबर पाटील (वय-२७) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकी काय हे घटना?
सार्वे येथील दिगंबर पाटील हे शेती करून कुटूंबाचा उदरविर्वाह करतात. त्‍यांना सुजित हा एकुलता एक मुलगा तर मोठ्या मुलीचे लग्‍न झाले आहे. दरम्‍यान सुजित याच्‍या आजोबांचे (आईचे वडील) निधन झाल्‍याने आई– वडील हे बुधवारी (२९ मार्च) हतनूर (कन्‍नड) येथे अंत्‍ययात्रेसाठी गेले होते. यावेळी सुजित हा घरी एकटाच होता. बुधवारी सकाळी साडेआठ– नऊ वाजेच्‍या सुमारास सुजित हा शौचास गेला असता त्‍याच्‍यावर बिबट्याने मागून हल्‍ला करत उसाच्‍या शेतात ओढत नेले.

अंत्‍ययात्रेवरून सुजितचे आई– वडील सायंकाळी घरी परत आले. यावेळी घराला कळी लावलेली दिसून आली. मुलाच्‍या मोबाईलवर संपर्क केला असता फोन उचलला नाही. यामुळे त्‍यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. परंतु, सुजित मिळून आला नाही. यामुळे रात्री नऊच्‍या सुमारास पोलिसात जावून तक्रार दिली. यानंतर नागरीकांनी शोधनू काढल्‍यानंतर गावापासून ५०० मीटरच्‍या अंतरावर दाखविले. पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिस दाखल होते. केले असता यानंतर त्‍या दिशेने शोध घेतला असता उसाच्‍या शेतात मोबाईल व सुजितचा मृतदेह आढळून आला. वन्‍य प्राण्याने हल्‍ला केल्‍याचे लक्षात आले. वनविभागाच्‍या पथकाने पंचनामा करत बिबट्याने (Leopard) हल्‍ला केल्‍याचा अंदाज वर्तविला आहे.