गावठी कट्टा हाताळताना गोळी सुटली अन् थेट छातीत घुसली, तरुणाचा मृत्यू; अमळनेरात खळबळ

मार्च 28, 2026 6:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून गावठी कट्टा हाताळताना सुटलेल्या गोळीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अरुण सुरेश महाजन (३५) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत सखोल तपास सुरू केला आहे.

golibar

प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन हा आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्याशी छेडछाड करत असताना अचानक गोळी सुटली आणि ही गोळी थेट त्यालाच छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

अरुण महाजन हा मंडप व्यवसायाशी संबंधित होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण असून, तो कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जात होता. त्यामुळे त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, नेमका प्रकार काय घडला याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अरुण महाजन याच्याकडे गावठी कट्टा कसा आला? तो परवानाधारक होता का? किंवा कोणाकडून आणला होता का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच, ही घटना खरोखरच अपघाती (मिस फायर) आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now