
जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
इयत्ता दहावीतील आयुष कल्पेश चौधरी आणि इयत्ता नववीतील जीत पंकज धैनजे या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील आंतरशालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयुष चौधरी याने १७ वर्षांखालील मुलांच्या ६६ किलो वजन गटात प्रभावी कामगिरी केली. तर जीत धैनजे याने १७ वर्षांखालील मुलांच्या ४० किलो वजन गटात आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली.
दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





