---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

शाळेत जाण्यापूर्वी शेतातून येतो असे सांगून, नंतर तरुणासोबत घडलं भयंकर; मुक्ताईनगरातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथील १७ वर्षीय तरुणाचा शेतात काम करीत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत शॉक लागलेल्या तरुणाला वाचवताना त्याचा मोठा भाऊ जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

kurha kakoda jpg webp webp

पारंबी (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी संतोष झांबरे यांना दोन मुले असून मोठा चेतन हा जळगाव येथे शिकतो. तर लहान गौरव हा नुकताच दहावीची परीक्षा ८३ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन त्याने अकरावीत प्रवेश घेतलेला होता. गौरव हा शाळेत जाण्यापूर्वी शेतातून येतो असे सांगून आपल्या मोठ्या भावासोबत १ जुलैला सकाळी शेतात गेला. त्या ठिकाणी गौरवला विजेच्या वायरचा जबर शॉक लागल्याने तो वायरला चिटकला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा मोठा भाऊ चेतन गेला असता, तो जोराने फेकला जाऊन गंभीररित्या जखमी झाला.

---Advertisement---

घटना घडताच आजूबाजूचे शेतकरी धावून आले. मात्र, तोपर्यंत निपचित पडलेला होता. आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. दोन्ही भावडांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, पुढील उपचारार्थ मलकापूरला पाठवण्यात आले. तेथे गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---