⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | युवकाला लग्नात मिळाले नोकरीचे ‘जॉइनिंग लेटर’‎

युवकाला लग्नात मिळाले नोकरीचे ‘जॉइनिंग लेटर’‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । पारोळा येथील नगरपालिकेत भगवान चौधरी हे‎ सफाई कामगार म्हणून कार्यरत‎ होते. त्यांचे दुःखद निधन झाल्याने‎ चौधरी कुटुंबावर मोठा आघात‎ झाला होता. वडिलांसोबत काही‎ काळाने आईचेदेखील निधन‎ झाल्याने या कुटुंबातील सतीश‎ चौधरी हा युवक एकटा पडला‎ होता. वडिलांच्या जागेवर नोकरी‎ मिळावी म्हणून सतीशने आपली‎ समस्या नगराध्यक्ष करण पाटील‎ यांच्याकडे मांडली. याची‎ तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष‎ पाटील यांनी शासन दरबारी‎ पाठपुरावा करून त्याला‎ ‎ विवाहातच नोकरीचे जॉईनिंग‎ लेटर दिले. या घटनेमुळे चौधरी‎ कुटुंबाला सुखद धक्का बसला.‎

सतीश चौधरी या युवकाला‎ कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याने‎ नगराध्यक्ष पाटील यांचे चौधरी‎ कुटुंबियांनी व नातलगांनी आभार‎ मानले. भगवान चौधरी यांनी‎ पालिकेत काम करत असताना‎ लौकिक मिळवला होता. मात्र‎ अचानकपणे त्यांचे निधन‎ झाल्याने सर्वांनाच धक्का बसला‎ होता. मुलांना उच्चशिक्षित‎ करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण‎ राहिले. पालिकेत भगवान चौधरी‎ यांच्या जागेवर त्यांचा मुलगा‎ सतीश याला रुजू करावे, अशी‎ कुटुंबाची इच्छा होती. मात्र योग्य‎ ‎ पाठपुरावा होत नसल्यामुळे गेल्या‎ अनेक वर्षांपासून हा विषय‎ प्रलंबित होता. ही बाब नगराध्यक्ष‎ करण पाटील यांच्या लक्षात‎ चौधरी कुटुंबीयांनी आणून दिली.‎ त्याची दखल घेत नगराध्यक्ष‎ पाटील यांनी क्षणाचाही विलंब न‎ करता पाठपुरावा करून,‎ सतीशला वडिलांचा जागेवर‎ शिपाई म्हणून नोकरी दिली.‎ यासाठी मुख्याधिकारी ज्योती‎ पाटील, कार्यालयीन अधीक्षक‎ संघमित्रा संदानशिव, लिपिक‎ लांबोळे यांच्या मदतीने योग्य तो‎ पाठपुरावा करण्यात आला. अखेर‎ सतीश चौधरी यास त्याच्या‎ लग्नातच नोकरीचे जॉईनिंग लेटर‎ देण्यात आले.‎

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह