---Advertisement---
जळगाव जिल्हा

गिरीश महाजनांचे ‘जलसंपदा’ फेल, गुलाबराव पाटीलांचे ‘पाणीपुरवठा’ विभाग राज्यात पहिले

---Advertisement---

१०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा निकाल जाहीर

jal jiwan gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२५ । शासकीय कार्यालयातील कामकाज सुधारुन गतिमानता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात २९ विभागाचा समावेश केला होता. राज्यातील पाच विभागाचा निकाल शनिवारी जाहिर करण्यात आला. यात प्रशासकीय कामकाजात पालकमंत्री गुलाबराव पाटील गिरीश महाजनांना वरचढ ठरले. त्यांच्या पाणीपुरवठा विभागाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला.

---Advertisement---

नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील १० विभागांनी प्रथम, ६ खात्यांनी द्वितीय तर ५ खात्यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवणारे खाते असे… उप विभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर, तहसीलदार जामनेर, उप अधीक्षक भूमी अभिलेख जामनेर, तालुका कृषि अधिकारी- चाळीसगाव, उप विभागीय पोलिस अधिकारी भुसावळ, पोलिस निरीक्षक (पोलिस ठाणे) एमआयडीसी, जळगाव. उप विभागीय वन अधिकारी यावल, उप अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा) जळगाव, मुख्याधिकारी, नगरपरिषद धरणगाव, वैद्यकीय अधीक्षक- वरणगांव, दुसऱ्यास्थानावर आलेले विभाग सहाय्यक वन संरक्षक/ उप विभागीय वन अधिकारी- जळगाव. वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव.

सहाय्यक पशु संवर्धन आयुक्त, तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय धरणगाव, पशुधन विकास अधिकारी- विवरा, ता. रावेर, सहायक निबंधक (सहकारी संस्था) धरणगाव, उप कोषागार अधिकारी, धरणगाव, कार्यालयीन सुधारणा, स्वच्छतेमुळे एमआयडीसी पोलिस ठाणे प्रथम : जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्याने कार्यालयीन सुधारणा व स्वच्छता या निकषात चांगली कामगिरी करुन प्रथम क्रमांक पटकावला. त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, सुविधा व उपाय योजनां या निकषातही उल्लेखनीय काम केल्याचे रिमार्क समितीकडून मिळाल्याचे पोलिस निरिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment