पिकअपच्या धडकेत पानटपरी चक्काचूर, व्यावसायिकाची आत्महत्या

ऑक्टोबर 20, 2021 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । मालवाहू पिकअपने पानटपरीला धडक दिल्याने पानटपरी जमीनदोस्त झाल्याच्या नैराश्यात पानटपरी मालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे उघडकीस आली. पुनमचंद श्रावण बारी(वय ४०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

New Project 5

याबाबत असे की, शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळ पुनमचंद बारी यांची लक्ष्मी पानटपरी आहेला. त्यांच्या या पानटपरीला १४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाच्या मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिली. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद बारी तणावात होते.

पानटपरीची नुकसान भरपाई देतो असे मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले होते. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालक नुकसान भरपाई देत नाही असे सांगितल्या नंतर पुनमचंद बारी यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचे पानटपरी हेच एकमेव साधन होते. शेवटी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२० वर्षांपासून ज्या पानटपरीवर पुनमचंद बारी यांचा उदरनिर्वाह होता. ती पानटपरी आता जमीनदोस्त झाली व आपल्यावर असलेले कर्ज कसे चुकवावे या चिन्तेने बारी यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातच बारी यांनी आज सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण, आई – वडील असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now