दिनकर नगरात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

ऑक्टोबर 4, 2021 12:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या दिनकर नगरातील मोहन टॉकीज जवळ राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला. नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे असे तरुणाचे नाव आहे.

jalgaon jpg webp

मयताचे मावस भाऊ नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर नगरातील मोहन टॉकीजजवळ नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. त्याचे स्वतःचे ट्रॅक्‍टर असून तो त्या ठिकाणीच काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो. रविवारीच त्याचा पगार झालेला होता.

रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर घराशेजारी असलेल्या पार्टिशनच्या खोलीत झोपायला गेला होता. सकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी यांनी उठून पाहिले असता नरेश याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now