क्षुल्लक कारणावरून तरूणास बेदम मारहाण

एप्रिल 13, 2022 5:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । शहरातील एका कंपनीतील मजूर दुसऱ्या कंपनीत पळविण्याच्या क्षुल्लक कारणावरुन तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना एमआयडीसीमधील जी सेक्टर जवळ घडली.

fight 1 jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील अयोध्यानगर येथील अरुण लक्ष्मण काकडे यांचा भाऊ विकास काकडे यांची एमआयडीसीमध्ये कंपनी आहे. दिलशान आलम रा.रचना कॉलनी हा काकडे यांच्या कंपनीतील मजूर दुसरीकडे घेऊन जात असल्याची माहिती अरूण काकडे यांना मिळाली. ११ एप्रिल रोजी अरुण काकडे यांनी एमआयडीसी जी सेक्टरजवळ दिलशान आलम याला याबाबतचा जाब विचारला असता त्यावर दिलशान आलम याने अरूण काकडे यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. अरुण काकडे यांचा भाऊ विकास हा समजविण्यास आला असता त्यालाही देखील दिलशान याने शिवीगाळ केली. अशा अरूण काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलशान आलम याच्याविरोधात मंगळवार १२ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now