दुर्दैवी ! जामनेरमध्ये विजेचा शॉक लागून पडल्याने तरुण मजुराचा मृत्यू

मे 11, 2026 1:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर येथील वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) कार्यालयासमोरच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. सागर इंगळे (वय २०) असं मयत तरुणाचं नाव आहे

sagar ingle

सागर इंगळे हा तरुण एका कंत्राटदाराकडे मजूर म्हणून कार्यरत होता, रविवारी रात्री जामनेर वीज कार्यालयाजवळ असलेल्या बीज खांबावरील दुरुस्तीचे काम त्याला देण्यात आले होते. कामाला सुरुवात करण्यापूर्वी खबरदारी म्हणून मुख्य रोहित्राचा (ट्रांसफॉर्मर) वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, ज्या खांबावर दुरुस्ती करायची होती, तिथे गावातील स्ट्रीट लाईट आणि रोहित्र असे दोन स्वतंत्र ‘कट पॉईंट’ होते.

मुख्य पुरवठा बंद केला असला तरी स्ट्रीट लाईटचा वीज प्रवाह तांत्रिक कारणास्तव सुरूच होता, ज्याची कल्पना कोणालाही आली नाही. सागर कामासाठी खांबावर चढला असता, त्याला अचानक सुरू असलेल्या स्ट्रीट लाईटच्या तारांचा जोरदार धक्का लागला. हा धक्का इतका भीषण होता की, सुमारे नऊ मीटर उंचीवरून तो थेट जमिनीवर फेकला गेला. खांबाजवळच असलेल्या दगडावर डोके आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now