बातम्याराष्ट्रीय

Australia vs India 4th Test : यशस्वी जयस्वालच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) वर सुरू आहे. या कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय संघाला जिंकण्यासाठी ३४० धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार अर्धशतकी खेळी केली. यामुळे यशस्वी जयस्वालच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. Yashasvi Jaiswal Record

तो ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळताना एकाच डावात सलग २ अर्धशतकं झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुरली विजय, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना हा कारनामा करता आला आहे.

यशस्वीने १२७ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे या मालिकेतील तिसरे अर्धशतक ठरले. यासह २०२४ मध्ये त्याच्या बॅटमधून आलेले हे १२ वे अर्धशतक ठरले. यासह तो एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button