तरुणांसाठी खुशखबर! महाराष्ट्र जलसंपदा विभागात तब्बल 4497 पदांवर भरती जाहीर

नोव्हेंबर 2, 2023 12:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राज्य सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागामार्फत (Jalsampada Vibhag Bharti) विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. WRD Maharashtra Recruitment 2023

Jalsampada Vibhag jpg webp

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 03 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 4 हजार 497 पदे भरली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. WRD Maharashtra Bharti 2023

या पदांसाठी होणार भरती :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क).

शैक्षणिक पात्रता: पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

वयोमर्यादा: लवकरच उपलब्ध होईल.
परीक्षा शुल्क (फी): खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी- ₹.१०००/-, मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023.

इतका पगार मिळेल :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/-
निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
आरेखक – 29,200/- ते 92,300/-
सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now