⁠ 
सोमवार, मे 13, 2024

रायसोनी महाविद्यालयात “मल्टीवर्स एस्पेक्ट्स ऑफ इट फील्ड”या विषयावर कार्यशाळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । रायसोनी महाविद्यालयात “मल्टीवर्स एस्पेक्ट्स ऑफ इट फील्ड”या विषयावर आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करत असतांना आयुष्यातील आनंदही अनुभवावा असे जी. एच रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी असलेले भाग्येश त्रिपाठी यांनी केले. त्यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला.

रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमाअंतर्गत भाग्येश त्रिपाठी हे कॉम्प्यूटर ऑप्लिकेशन विभागाच्या विध्यार्थ्यांशी बोलत होते. श्री. त्रिपाठी हे सध्या मुंबई येथील वेअरसिटीज या कंपनीत सायबर सेक्युरिटी ऑनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सायबर सेक्युरिटी ऑनालिस्ट या क्षेत्रातील विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करत कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख यांनी केले. सुत्रसंचालन रुपाली ढाके व प्रा. विनोद महाजन यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक व बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, शिक्षक व शिक्षक्केतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.