जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । पाणीपुरवठ्याबाबत जळगाव शहर वासियांसाठी महत्वाची बातमी आहे. एकीकडे तापमानाने चाळिशीपार केल्याने उकाड्याने नागरिक हैराण असताना आता पाणीपुरवठा रोटेशनमध्ये बदलाची नवीन समस्या निर्माण झाली आहे. वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत वाहिनी स्थलांतरासाठी शहरात २८ मार्चचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारचा पुरवठा आता शुक्रवारी केला जाणार आहे.
वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्र विद्युत वाहिनी एमआयडीसीच्या एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित करण्याचे काम २८ मार्च रोजी महावितरणकडून होणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने उपसा व जलशुद्धीकरण केले जाणार नाही आणि शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. आता २८ रोजीचा पुरवठा २९ रोजी होईल. तसेच २९ व ३० रोजीचा पुरवठा ३० व ३१ मार्च रोजी होणार आहे
शुक्रवारी या भागात पुरवठा होणार
शनीपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, शाहूनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल, हुडको, रिंगरोड, भोईटेनगर, जुने गाव, सिंधी कॉलनी, ओंकारनगर, जोशी पेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, श्रद्धा कॉलनी, प्रभात कॉलनी, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, समता नगर, स्टेट बँक कॉलनी, मेहरूण परिसरसह मिल्लतनगर या भागात पुरवठा होईल.