नाथाभाऊंची घरवापसी फिक्स.. पण लेकीचं काय? भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रोहिणी खडसेंचं ट्विट

एप्रिल 7, 2024 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात परतनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर भाजपत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातच रोहिणी खडसे यादेखील प्रवेश करणार असल्याचे चर्चा होत्या. मात्र रोहिणी खडसे यांनी ट्विट करत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

rohini khadse eknath jpg webp

रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सांगितले की, ‘मी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे. मी याच पक्षात आहे. भविष्यातही याच पक्षात राहणार आहे’ असे ट्विट केले. यामुळे रोहिणी खडसे या एकनाथराव खडसे यांच्यासोबत भाजप पक्षात प्रवेश करणार नसल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली आहे. सुबह का भुला, शाम को घर पे वापस आ गया… बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भाजपमध्ये येतोय. त्यांच्या मूळ विचारधारेमध्ये येतोय. एकनाथ खडसे पुन्हा 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now