जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित मॅटलॅब इलेक्ट्रीकल कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळा प्रा. अमित म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, विद्युत विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील, प्रा. अतुल बर्हाटे, प्रा. सचिन महेश्री, प्रा. हरीश पाटील, प्रा. नेमीचंद सैनी उपस्थित होते. प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात व त्याचा फायदा भविष्यात होतो हे नमूद केले.
मॅटलॅब कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी फंडामेंटल ऑफ मॅटलॅब, सॉफ्टवेअरचे वर्किंग एनवोर्मेन्ट, मॅटलॅब फंक्शन्स या गोष्टी शिकवण्यात आल्या. पाच दिवसात विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. अमित म्हसकर यांनी काम पहिले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रुती सोनार,रेणुका अहेर या विद्यार्थिनींनी केले.