⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | विजेचा जोरदार धक्का बसल्याने महिलेचा मृत्यू ; अमळनेरची घटना…

विजेचा जोरदार धक्का बसल्याने महिलेचा मृत्यू ; अमळनेरची घटना…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । जळगाव जिल्हा हा नेहमीच तापमानाच्या बाबतीत चर्चेत असतो. यावर्षी देखील जळगाव जिल्ह्यात पुन्हा तापमानाने सर्वाधिक उच्चांक गाठला होता. जळगाव जिल्ह्यात अजून देखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. याच उकाळ्यापासून वाचण्यासाठी नागरिक एसी आणि कुलरचा वापर करत असतात,परंतु कुलरचा वापर करताना सावधानी बाळगणे गरजेचे आहे. उन्हापासून बचाव करण्याकरिता वापरत असलेल्या कुलरला महिलेचा धक्का लागला, परंतु त्या कुलर मध्ये वीज प्रवाह उतरला असल्याने विजेचा जोरदार झटका बसून एका महिलेचा मृत्यू झाल्याची, धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे उघडकीस आली आहे.योगिता सुनील गोसावी वय ४२ असे मृत महिलेचे नाव आहे.

या अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे राहत होत्या. गेल्या दोन दिवसापासून दुपारी कळकळून ऊन पडत असल्याने, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कुलरचा वापर सगळीकडेच केला जातो. या पार्श्वभूमीवर योगिता सुनील गोसावी यांच्या घरी देखील कुलर चा वापर केला जात होता. यादरम्यान दिनेश गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जूनला सायंकाळी योगिता गोसावी या कुलर जवळ गेल्या असता, त्यात विद्युत प्रवाह शिरल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला.

योगिता गोसावी यांना विजेचा झटका बसल्याने त्या ओरडायला लागल्या, त्यांचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले. परंतु त्यांना त्या खाली पडलेल्या दिसल्या. यानंतर त्यांना अमळनेर (ग्रामीण) रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपास केला,असता त्यांचा त्या विजेच्या झटक्यात मृत्यू झाल्याचे घोषित केले. यावेळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला या घटने प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

author avatar
Manasi Patil